गुहागर:-परभणी येथील घडलेली घटना, संविधान रक्षक सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या, बीड मधील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच लोकसभेत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेले वक्तव्य अशा पाश्वभूमीवर गुहागर तालुक्यामधील बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे संयुक्त विद्यमाने गुहागर येथे नुकताच बौद्ध समाजाच्या वतीने गुहागर मधील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करून शिवाजी चौक ते गुहागर तहसीलदार कार्यालय असा बौद्ध समाजाचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी “एकच साहेब बाबासाहेब, बाबासाहेब”, “हम कहेंगे आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर”, “हम कहेंगे आंबेडकर,बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर”, “तुम भी बोलो आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर”, “दुनिया से भारी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर,बाबासाहेब आंबेडकर”, “अरे हमारी जान है आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर”, ” देश की शान है आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर”, “भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो”, “जबतक सुरज चॉंद रहेगा, बाबा आपका नाम रहेगा/”, “मग या अमित शहाच करायचं काय खाली डोकं वरती पाय”, “आले रे आले जयभिम वाले..!”, “हा आवाज कुणाचा जयभिम वाल्यांचा..!” अशा गगनभेदी घोषणांनी बौद्ध समाजाच्या जन आक्रोश मोर्चाने गुहागर दणाणले.
यावेळी बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनांचे वतीने गुहागरचे तहसीलदार परिक्षीत पाटील यांना संयुक्त निवेदन दोन्ही धम्म संघटनांचे वतीने सुरेश (दादा) सावंत, एस. एल. सुर्वे, मारुती मोहिते, आप्पा कदम, दत्ताराम कदम, वसंत कदम, वैभव गमरे, राकेश पवार, मनोज गमरे, सुरेश जाधव, प्रभाकर मोहिते, सचिन पवार, विनोद यादव,राजू मोहिते यांनी दिले. हे निवेदन मुख्यमंत्री,राज्यपाल, राष्ट्रपती, प्रांत यांना तहसीलदार यांचे वतीने पाठविण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी गुहागर पोलीस मैदान येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला रिपब्लिकन पक्षाचे गुहागर तालुका प्रवक्ते शशिकांत जाधव, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रितम रुके, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक एस. एल. सुर्वे, बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
या जनआक्रोश मोर्चाला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाअध्यक्ष प्रितम रुके, राज्य कार्यकारणी सदस्य आणि दलित मित्र दादासाहेब मर्चंडे,विजय खैरे, उमेश पवार, महेंद्र कदम, मायकल कदम, भिमसेन सावंत, शंकर मोहिते, विलास जाधव, अनिल जाधव आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अतिशय शिस्तबद्ध जन आक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली. या जन आक्रोश मोर्चाला आंबेडकर अनुयायी महिला- पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.