रत्नागिरी:-दैवज्ञ हितवर्धक समाज व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरी दैवज्ञ चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी झोनल मॅनेजर अंजनीकुमार आझाद यांच्या हस्ते झाले. यावेळी दैवज्ञ हितवर्धक समाज संस्थेचे अध्यक्ष संतोष भुर्के, उपाध्यक्ष सुहास वीरकर, सेक्रेटरी धनेश रायकर, खजिनदार गुरुप्रसाद खेडेकर, कार्याध्यक्ष संतोष खेडेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते, स्पर्धा प्रमुख सचिन बंदरकर यांच्यासह खेळाडू आणि प्रेक्षक उपस्थित होते. स्पर्धेला प्रमुख प्रायोजक म्हणून बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस शिवाजीनगर, रत्नागिरी, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स रत्नागिरी व आकार इन्फ्रास्टेचर यांनी सहकार्य केले होते.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला आयसीएफ कप विजेता व दोन वेळा विश्व उपविजेता शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू रियाज अकबर अली, संतोष भुर्के, सुहास वीरकर, धनेश रायकर, गुरुप्रसाद खेडेकर, प्रदीप भाटकर, मिलिंद साप्ते, सचिन बंदरकर उपस्थित होते. स्पर्धेला प्रमुख पंच म्हणून मंदार दळवी व सागर कुलकर्णी यांनी काम पाहिले. स्पर्धेत राहुल भस्मे, तन्मय खातू, अभिषेक चव्हाण यांनी ३ ब्रेक टू फिनिशची नोंद केली.
स्पर्धेचा निकाल असा : पुरुष एकेरी अंतिम फेरी – अभिषेक चव्हाण विजयी विरुद्ध राहुल भस्मे (२१-२५), (२५-०८), (२५-१२). उपांत फेरी १ – अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध तन्मय खातू (२५-००), (२५-११). उपांत फेरी २ – राहुल भस्मे विजयी विरुद्ध योगेश कोंडविलकर (२० -१८), (०८-२५), (२५-०४).
पुरुष दुहेरी अंतिम फेरी – राहुल भस्मे/मुक्तानंद वरवडेकर विजयी विरुद्ध संजय कोंडविलकर/योगेश कोंडविलकर (१०-१५), (१२-०८), (११-०८). उपांत फेरी १- संजय कोंडविलकर/योगेश कोंडविलकर विजेता विरूद्ध अभिषेक चव्हाण/दत्ताराम वासावे (१०-२०), (१७-१६), (१३-०४). उपांत फेरी २- राहुल भस्मे/मुक्तानंद वरवडेकर विजयी विरुद्ध सौरभ महाकाळ/तन्मय खातू (१०-१२), (१२-१०), (१२-१०).
कुमार गट अंतिम फेरी – ओम पारकर विजेता विरूद्ध हर्षल पाटील (१९-०५), (२४-००)
किशोर गट अंतिम फेरी- स्मित कदम विजेता विरुद्ध सर्वेश आमरे (२५-०१), (१४-००).
कुमारी गट अंतिम फेरी- स्वरा मोहीरे विजेती विरुद्ध निधी सप्रे (००-१४), (१२-०६), (११-०८).