चिपळूण: मध्यवर्ती बसस्थानक चिपळूण येथे महिलांच्या सोयींसाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गरजेच्या सुविधांनी युक्त हिरकणी कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मेहेर मॅडम, पोलीस उपनिरीक्षक व डॉ. ज्योती यादव, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीपाद देशपांडे, एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेडचे Side Head AVP, सचिन खरे, विनती ऑरगॅनिक लिमिटेड चे PRO, नंदन सुर्वे, नेरोलॅक पेंट्स लिमिटेड चे HR Head लोटे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना असे म्हटले की, हिरकणी कक्ष ही महिला सक्षमीकरणाची एक नवी पायरी असून महिला आणि माता यांना सुरक्षित व सुसज्ज ठिकाण उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आदर्श ठरेल. रोटरी क्लब चिपळूणचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर यांनी कक्षाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, ही महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्यासाठी तसेच मुलांसह आराम करण्यासाठी सुसज्ज आणि शांत जागेची सुविधा उपलब्ध करून देईल. हिरकणी कक्षाची वैशिष्ट्ये स्तनपानासाठी स्वतंत्र जागा, आरामदायी आसन, हायजिनिक सुविधा, लहान मुलांसाठी खेळणी आणि आरामदायी व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभाला मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार प्रमुख दिपक चव्हाण, अर्चना ठसाळे, सानिया हातकमकर वाहतूक निरीक्षक, रश्मी सुर्वे, आगार लेखाकार मनोरकर, वरिष्ठ लिपिक, सुशांत मोहिते वरिष्ठ लिपिक, अमोल मोहिते वरिष्ठ लिपीक हिरकणी कक्षाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून मंगेश माटे व राजेश नारकर यांनी काम पाहिले.
तसेच रोटरी क्लब तर्फे राजेश ओतारी- चिटणीस, प्रकाश गगनग्रास, विनोद घुमरे, वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, शैलेश टाकळे, प्रकाश लटके, रमण डांगे, अंकुश गांधी, प्रसाद सागवेकर, प्रतिक रेडीज, निनाद देवळेकर, डॉ. नोमान अत्तार आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश गांधी यांनी केले. सर्व नागरिकांकडून, प्रवाशांकडून या स्तुत्य कार्यक्रमाचे स्वागत व आभार देखील मानले.