चिपळूण:- चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानाच्या धर्तीवर अलोरे येथील मैदान सुसज्ज होईल व येथील पंचक्रोशीतील खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी अलोरे येथील खेळाच्या मैदानाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
अलोरे येथील खेळाच्या मैदानाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्यासह येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार निकम यांनी या खेळाच्या मैदानाच्या विकसित कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल येथील ग्रामस्थांतर्फे आ. निकम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, ज्येष्ठ नेते व जिल्हा नियोजन सदस्य दादा साळवी, माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, मयुर खेतले, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, जयंत शिंदे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. जागृती शिंदे, अलोरे शिरगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील, दत्ताराम बंगाल, प्रकाश कदम, रमेश बंगाल, एकनाथ साळवी, मनोहर कोठारी, अरविंद सागवेकर, अनिल कोठारी, प्रकाश पालांडे, सरपंच नागावे श्री. महाडिक, सरिता राणे सरपंच कोळकेवाडी सिद्धी चव्हाण, सरपंच अलोरे प्रमोद महाजन, उपसरपंच राकेश जाधव, अमित चव्हाण, तुषार चव्हाण, राजेश चव्हाण, मधुकर इंदुलकर, विलास कांबळे, सुधाकर, सुधाकर शिंदे, सिकंदर चिपळूणकर, इकबाल मुल्ला, डॉ. रणजीत पाटील, अविनाश कोलगे, योगेश बोलाडे, सिताराम वीर, सहदेव राणे, तुकाराम चौधरी, वसंत गार्डी, रसिका कोठारी, धनश्री घाणेकर,अरुण सागवेकर, मानसी कदम, मीनाताई बंगाल रवींद्र शिंदे तसेच अधिकारी उपस्थित होते.