खेड : शहरातील महाडनाका येथे 27 वर्षीय डॉक्टर महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. तसलीमा महम्मद युनूस असे मृत महिलेचे नाव आहे. ती बांग्लादेशातून माहेरी आली होती. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या बाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
तसलीमा युनूस हा 5 वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर ती बांग्लादेश येथे सासरी वास्तव्यास होती. ती गर्भवती असल्याने एप्रिल 2024 मध्ये माहेरी आली होती. 14 जुलै रोजी ती प्रसुती होवून मुलगी झाली होती. शुक्रवारी दुपारच्या सुमारास तिने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब तिचा भाऊ जहिरूद्दीन शिकलगार याच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.
बांगलादेशवरून खेडमध्ये माहेरी आलेल्या डॉक्टर महिलेची गळफासाने आत्महत्या
