सर्वच शाळेत दोन शिक्षक देण्याची पालकांची मागणी
रत्नागिरी : जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाने शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील स्थानिक डी. एड, बी. एड धारकांना कंत्राटी तत्वावर 491 शिक्षकांची नियुक्ती केली तर रत्नागिरी नगर परिषदेने चार शिक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे पालकांमध्ये शिक्षक मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.परंतु दहा पेक्षा जास्त पट असलेल्या शाळेत एकच शिक्षक कार्यरत असल्यामुळे पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.. शासनाने स्थानिक शिक्षक भरण्याचा निर्णय घेतलाच असेल तर पहिले ते चौथी पर्यंत सर्व शाळांना दोन शिक्षक तर पहिली ते सातवी पर्यंत चार शिक्षक जिल्हा परिषदेने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
या भरतीमुळे गुणवत्ता वाढण्यासाठी मोठी मदत होणार आहे.अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काम करणारे शिक्षक जिल्हा परिषद शाळेत जॉईन झाले आहेत.. त्यामुळे खेड्यापाड्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या गुणवत्तेत नक्कीच भर पडेल. जिल्हा बदली करून शिक्षक गेल्यामुळे इथल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत जात होता. मागील वर्षी स्थानिक शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळा वाचल्या होत्या.शाळा उघडायला शिक्षक नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या वर्षी शाळांना मोठया प्रमाणात शिक्षक मिळाले असले तरी सर्व शाळांना ते उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
कमी पट संख्या असलेल्या शाळेत दोन शिक्षक, जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत मात्र एकच शिक्षक
