चिपळूण:-तीन दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील भोगाळे येथे अपघातात जखमी झालेल्या सौ. अंजली संजीव दाभाडे (४०, वरची पेठ शिवाजीनगर, खेर्डी) यांचे आज सायंकाळी पाच वाजता कराड येथे उपचारादरम्यान निधन झाले.
भोगाळे येथे दुचाकींच्या तिहेरी अपघातात अंजली या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. बहादुरशेखनका येथील आदित्य मोटर ड्रायव्हिंग स्कुलचे मालक संजीव दाभाडे यांच्या त्या पत्नी होय. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.