अपूर्वा सामंत यांची विशेष उपस्थिती
राजापूर:-कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ संस्थेला सलग्न यशवंती श्रमिक सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित तारळ ता.राजापूर संस्थेचा पारदर्शक कारभार,योग्य प्रकारे दूध पुरवठा व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे, विविध वैशिष्ट्य ठेउन काम करत संस्थेचा 3 वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या वर्धापन दिन सोहळ्यास युवानेतृत्व अपूर्वा किरण सामंत यांनी उपस्थिती लावत संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या, जनावरांच्या आरोग्य विषयी आवश्यक सोयीसुविधा, महाराष्ट्र शासनाच्या पशुधन संबंधी योजना, तसेच दुग्ध व्यवसाय संबंधी शेतकर्यांची चर्चा केली. यापुढे दुग्ध व्यवसाय संबंधी असणार्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मा.सभापती प्रकाश कुळेकर,राजापूर निरीक्षक संदेश सावंत, सरपंच सौ. वैजयंती दाभोळकर,पशुधन विका अधिकारी राजापूर तालुका वैभव चोपडे, सहाय्यक प.वि.अधिकारी राजापूर ता. प्रभात किनरे,संस्थेचे दीपक लिंगायत मा.सरपंच ओमकार प्रभुदेसाई, तारळ मा.सरपंच सुहास कुवरे, मा.उपसभापती प्रशांत गावकर, कोदवली विभागप्रमुख जितेंद्र तूळसवडेकर, संस्थेचे अध्यक्ष संतोष वेद्रुक, उपाध्यक्ष श्रीपाद प्रभुदेसाई, सचिव अभिजीत तारकर, कुंभवडे चे संतोष अग्रे, बाबू मेस्त्री, शाखाप्रमुख तारळ भूषण तारकर, जगद्गुरु संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र गावकर, शा.प्र. दिलीप धुमाळ, शा.प्र. प्रकाश पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.