रत्नागिरी : नजीकच्या पावस-गोळप समुद्रक्षेत्रात कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर नौकेने अतिक्रमण करत रत्नागिरीतील मत्स्य विभागाच्या गस्तीनौकेवर हल्ल्याचा प्रयत्न केला होत़ा. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मलपी येथील अधिरा नौकेवर जप्तीची कारवाई करुन 7 खलाशांना अटक करण्यात आल़ी. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पूर्णगड पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल़ा.
देवेंद्र तिमाप्पा मोगर (37, ऱा भटकळ कर्नाटक), संतोष कृष्णा दामोदलेकर (55, ऱा आमदाली कर्नाटक), लोकेश महाबळेश्वर मोगर (31, ऱा भटकळ, कर्नाटक), मोहन मंजुनाथ मोगर (31, ऱा भटकळ कर्नाटक), विनोद मंजुनाथ मोगर (35, ऱा कर्नाटक, उत्तर कन्नडा ), चिकाटी रामाराव (ऱा आंध्रप्रदेश), वसंत चला मोगर (38,ऱा भटकळ कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 132, 189(2), 190, 115, 351 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा.