खेड : तालुक्यातील साखरोली-मोरेवाडी येथील जंगलमय भागात गुरुवारी दुपारच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळला. ही महिला 26 नोव्हेंबर ते 9 जानेवारी या कालावधीपासून बेपत्ता होती.
गुरुवारी जंगलमय भागातील परिसरात शोध घेत असताना साखरोली-मोरेवाडीतील जंगलमय भागात कुत्रे भुंकताना आढळले. त्यानुसार जवळ जावून पाहिले असता एक मानवी सांगाडा निदर्शनास आला. सांगाडयाच्या अंगावर लाल रंगाची साडी व गळयात दोरा होता. त्यावरून त्या महिलेची ओळख पटली. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली