सुदर्शन जाधव/खेड:-खेड लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सुयोग पदुमले ‘लायन्स श्री 2025’ किताबाचा मानकरी ठरला. ‘लायन्स फिटनेस किताब’ शुभम दिवेकर याला प्रदान करण्यात आला.
तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात आयोजित क्रीडा महोत्सवातील शरीरसौष्ठव स्पर्धेत तालुक्यातील 25 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. लायन्स क्लब ऑफ सिटो अध्यक्ष सुरेश चिकणे, कार्यक्रमप्रमुख राजेश जोयसर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडल्या. विजेत्यांना मनसे राज्य सरािाटणीस ऍड. वैभव खेडेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. लायन्स क्लबच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या समाजोपयोगी कार्यक्रमांचे खेडेकर यांनी कौतुक केले.
याप्रसंगी सचिव संतोष शिंदे, कार्यक्रमप्रमुख ओमकार गोंदकर, शैलेश धारिया, डॉ. विरेंद्र चिखले, विनोद मोरे, खजिनदार प्रवीण पवार, महेंद्र शिरगावकर, मिलींद तलाठी, डॉ. विक्रांत पाटील, अविनाश दळवी, पंकज शहा, निनाद गांधी, महेश वादक, डॉ. मरकड यांयासह पदाधिकारी उपस्थित होते.