सावर्डे/संदीप घाग:-14 वी राष्ट्रीय व 7 वी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा नुकतीच लोहगाव पुणे येथे स्मार्ट कीड अबॅकस च्या वतीने संपन्न झाली. या स्पर्धेत अमेय क्लासेस सावर्डेच्या सहा विदयार्थ्यांना अबॅकस पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.या विद्यार्थ्यांनी अबॅकस च्या 8 लेव्हल पूर्ण केल्या आहेत.यामध्ये समर्थ योगेश सोनवणे, विहान दिनेश सुर्वे, अमेय रामचंद्र नांदीवडेकर, भाविका प्रदीप राजेशशिर्के, श्रावणी मिलींद जाधव, आर्या रामचंद्र नांदीवडेकर यांना अबॅकस पदवी सन्मानपूर्व प्रदान करण्यात आली.तर अबॅकस विविध लेव्हल साठी 20 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशिस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. अमेय क्लासेस सावर्डेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये गणितीय आवड निर्माण व्हावी यासाठी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हा कोर्स घेतला जातो. याचे मार्गदर्शन सौ.अर्चना जयवंत पवार मॅडम या करत असून त्यांना यावर्षीचा बेस्ट फ्रेंचायसी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.या यशाबद्दल संचालिका सौ. वृषाली नांदिवडेकर मॅडम, पालकवर्ग यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.