दापोली:-तालुक्यातील विसापूर पाथरी-वाडी येथील चंद्रकांत गुंडू मसूरकर (64, मूळ गाव वरची मळेवाड, ता. सावंतवाडी, सध्या विसापूर) या प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 9 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश शिरोडकर यांचा कातभट्टीचा उद्योग आहे. ते विसापूर येथे राहतात. त्यांच्याकडे चंद्रकांत मसूरकर हे कामासाठी होते. 9 जानेवारी रोजी रात्री 11 च्या सुमारास मसूरकर यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. दापोली पोलीस ठाणेत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलीस ठाणेचे हेडकॉन्स्टेबल पवार करीत आहेत.