रत्नागिरी : तालुक्यातील रिळ भंडारवाडी येथे दोन बंद घरे फोडून २५ हजारांची रक्कम चोरीस गेल्याची घटना ७ जानेवारी सकाळी १० ते ८ जानेवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अमर वसंत चव्हाण (६७, रिळ, भंडारवाडी, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिसात दिली. त्यानुसार अज्ञातावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर चव्हाण यांचे बंद घर कोणीतरी अज्ञाताने ७ ते ८ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास घराचा पुढील दरवाजाचा कडी कोयंडा हत्याराने तसेच लाकडी दरवाजाच्या चौकडीला लॅचची कडी उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा हत्याराने उचकटून लॉकरमधील २५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच त्यांच्या शेजारी असलेले मुंबईस्थित ग्रामस्थांचेही घरही कुलूप तोडून घरातील कपडेलत्ते बाहेर फेकून दिले. मात्र यामध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी अमर चव्हाण यांनी जयगड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार ८ जानेवारी रोजी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.
रत्नागिरी : रिळ येथे भरदिवसा दोन घरे फोडून 25 हजारांचा ऐवज लंपास
