रत्नागिरी:-रत्नागिरी एमआयडीसीमध्ये उभारणी होत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचे कामाला अधिक गती देण्यासाठी आवश्यक 15 कोटीहून अधिक रुपयांच्या निधीची मागणी शालेय क्रीडा विभागाकडे करण्यात आली होती. यासाठी रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे उर्वरित पंधरा कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मागील काही वर्षापासून रखडलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला गती आली नव्हती. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये आता मंजूर झालेल्या सुधारित अंदाजपत्रकामुळे लवकरच जिह्याचे अद्ययावत क्रीडा संकुल उभे राहणार आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या 7 कोटी रुपयांमध्ये या कार्यालयाची देखणी इमारत उभी राहिली होती. त्यानंतर संकुलाचे कामाला काही प्रमाणात संथगती आली होती. यासाठी आवश्यक 15 कोटीहून अधिक रुपयांच्या निधीची मागणी शालेय क्रीडा विभागाकडे करण्यात आली होती. मंत्री सामंत यांया प्रयत्नामुळे उर्वरित 15 कोटीहून अधिक रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे एकूण 23 कोटींच्या या क्रीडा संकुलाचे काम वेगाने सुरू झाले आहे. उद्योगमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्यो जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी सांगितले.
सध्या या ठिकाणी बंदीस्त खेळांसाठीची मैदानाची उभारणी केली जात आहे. बॅटमिंटनसह अन्य खेळांना यामुळे चालना मिळणार आहे. क्रीडा संकुलात लवकरच ऑलिंपिक दर्जाचा धावण्यासाठीचा सिंथेटिक ट्रक, कबड्डी, खो – खोसाठी मैदान, फुटबॉल हॉकीसाठी मैदान काम हाती घेतले जाणार आहे. जिह्यातून येणाऱ्या खेळाडूंसाठी विश्रांतीगृह व निवास व्यवस्थाही येथे होणार आहे. त्यामुळे सर्व खेळांची शिबिरे भविष्यात या ठिकाणी घेता येणार आहेत.