रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे हनुमाननगर परिसरात मंगळवारी रात्री एका क्लिनिकमध्ये चोरटे घुसले. या ठिकाणी चोरटयानी क्लिनिकचे कुलूप तोडून आतील कपाटही फोडले, मात्र चोरटयाच्या हाती काहीही न लागल्याने ते पसार झाल़े. एकूण चार चोरटे त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आह़े.
दरम्यान चोरट्यांनी बंद क्लिनिकचे ग्रीलच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केल़ा. आतील कपाट व त्याचे लॉकर तोडून सामान अस्ताव्यस्त केल़े. त्यावेळी कोणताही किंमती ऐवज चोरटयाच्या हाती लागलेला नाह़ी. ही बाब बुधवारी सकाळी निदर्शनास येताच परिसरात खळबळ उडाल़ी. त्या बाबत पोलिसांनाही खबर देण्यात आल़ी घडल्या प्रकाराविषयी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल़े त्यामध्ये चार चोरटे घराच्या आवारात वावरताना दिसून येत आहेत़.
रत्नागिरी मिरजोळे येथे डॉक्टरचे क्लिनिक फोडले, चोरटे सीसीटिव्हीत कैद
