दोन दिवसात पत्रे न हटवल्यास मनसे स्टाईलने हटवणार
रत्नागिरी:-रत्नागिरीतील थिबा पॅलेस परिसरातील ‘ग्रीन झोन’मध्ये वृक्षाची बेसुमार कत्तल एका खासगी विकासकाकडून केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुधवारी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरली. घडल्या प्रकरावरून नगर परिषद प्रशासनाच्या नावाने जोरदार कल्लोळ करण्यात आला. मुख्याधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी येईपर्यंत रस्त्यात ठिय्या आंदोलन झाले. त्यावेळी वृक्षांची झालेली कत्तल ही ग्रीन झोनला लागूनच असलेल्या नगर परिषदच्या आरक्षणातील जागेवर असल्याचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी स्पष्ट केले.
जगप्रसिद्ध थिबा राजवाडा, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, अफ्पर जिल्हाधिकारी आदींसह अप्पर महत्वाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या परिसरातील ‘ग्रीन झोन’मधील झाडांच्या कत्तला प्रकार येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यानी समोर आणला.
या घडलेल्या वृक्षतोड प्रकरणी रत्नागिरी नगर परिषदेकडून कोणतीही कार्यवाही दखल न घेतल्यामुळे बुधवारी रत्नागिरी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदाळकर यांच्या नेतृत्वाखाली त्या जागेच्या ठिकाणी उतरले होते. त्यांच्यासोबत अरविंद मालाडकर, भाऊ गुळेकर, सािान शिंदे, संध्या कोसुंबकर, ऍड. अश्विनी आगाशे आदीं उपस्थिती होती. या आंदोलनावेळी रत्नागिरी नगर परिषदेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मानसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली.
येथे झालेल्या वृक्षतोडप्रकरणी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यानी प्रत्यक्ष येऊन आम्हाला उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. जोपर्यंत ते जाग्यावर येत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा घेण्यात आला होता. त्यावेळी मुख्याधिकारी येईपर्यंत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारत रास्तारोको केला.
त्यानंतर काही वेळाने मुख्याधिकारी बाबर आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले. आंदोलनकर्त्यांनी त्यांना वृक्ष तोडीचा जाब विचारत विकासकाला दिलेली परवानगी, ग्रीन झोनचे असलेले आरक्षण याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली, पण मनसे पदाधिकाऱ्यानी त्या झालेल्या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवत तेथे केल्या जाणाऱ्या बांधकामालाही विरोध दर्शवला. जेवढी वृक्षतोड झाली आहे, त्यांची शासन नियमाप्रमाणे दंड आकारणी व तत्काळ वसुली झाली पाहिजे. वृक्षतोडप्रकरणी पंचनामा केला जावा, संबंधित विकासकावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तेथील जागेला लावलेले पत्रे तत्काळ हटवले जावेत, अन्यथा 2 दिवसात कोणता कार्यवाही न झाल्यास ते पत्रे मनसेस्टाईल आंदोलनाद्वारे हटवले जातील, असा इशारा जिल्हाध्यक्ष सौंदाळकर यांनी दिला आहे..
वृक्षतोड ग्रीन झोनमध्ये नसून निवासी आरक्षित जागेवर तुषार बाबर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, नगर परिषदेने त्या ठिकाणी वृक्षतोड करण्यास कोणतीही परवानगी दिलेली नाही. ती वृक्षतोड केलेली जागा ही ग्रीन झोनमध्ये येत नसून त्यावर न.प. पार्किंगचे आरक्षण होते. पण सांलक टाऊन फ्लॅनिंग, पुणे यांच्या स्तरावरून ते आरक्षण बदलून आता रेसिडेन्शीयलसाठी आरक्षण केले आहे. त्यामुळे न.प.ने खासगी कन्स्ट्रक्शनसाठी त्या ठिकाणी कोणतीही परवानगीही दिलेली नाही व त्या बाबत कुठलीही शिफारस केलेली नसल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले. पण झालेल्या वृक्षतोड प्रकरणी न.प.ने 12 झाडांची परवानगी देत 50 झाडे लावायला आदेशही दिले आहेत. पण त्यापेक्षा जास्त झाडे तोडली असतील तर विकासकाला नोटीस देण्यात येईल. कन्स्ट्रक्शनी परवानगी नसल्याने तेथील पत्रे काढण्याचे आदेश करणार असल्योही बाबर यांनी सांगितले.