रत्नागिरी : तालुक्यातील गोळप फाटा येथे मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरटयानी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 6 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडल़ी. एकूण 48 हजार रुपये किंमतीच्या 24 बॅटऱ्या तसेच कॅनमध्ये ठेवलेले 20 लिटर डिझेलही चोरीला गेल्याचे पूर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आले आह़े. त्यानुसार पोलिसांनी चोरी करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा.
सुहास दत्ताराम चव्हाण (44, ऱा गवाणे लांजा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होत़ी. त्यानुसार सुहास चव्हाण हे गोळप येथील मोबाईल टॉवरच्या देखरेखीचे काम करतात़. या टॉवरच्या तळाशी पत्र्याची बंदिस्त केबीन असून त्यामध्ये बॅटऱ्या ठेवण्यात आल्या होत्य़ा. 6 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास चोरटयाने पत्र्याच्या केबीनचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केल़ा तसेच आतील 24 बॅटऱ्या चोरुन नेल्या, अशी तक्रार पूर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आल़ी. पोलिसांनी या प्रकरणी चोरटयाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कायदा कलम 334(1), 305 (अ) नुसार गुन्हा दाखल केल़ा. पुढील तपास पूर्णगड पोलिसांकडून करण्यात येत आह़े.