रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा येथील 30 वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 7 जानेवारी रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. अफजल हुसेन तलुकदार (30, रा.मुरुगवाडा रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अफजल हा 7 डिसेंबर रोजी त्याचा मित्रासोबत घराचे फ्लास्टरचे काम करत होता. यानंतर सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास फ्लास्टरचे काम सुरु असताना अफजलचा हात विजेच्या तारेला लागला. यावेळी विजेचा जोराचा धक्का बसल्याने अफजल हा खाली कोसळला. त्याच्या मित्राने काठीने विजेच्या तारेला बाजूला करुन अफजल याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यानी अफजल याला तपासून मृत घोषित केले.