रत्नागिरी : महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी १ हजार कोटीहून अधिक रकमेचा आयपीओ सूचीबद्ध करण्याच्या तयारीत असल्याची बातमी आली आहे. या संदर्भात कंपनीने ‘सेबी’कडे एक निवेदन सादर केले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांसह पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या जिल्हयांमध्ये शहरी गॅस वितरणासाठी नवीन – परवाने मिळवून आपला कामाचा व्याप महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी वाढवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, गेल, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड या कंपन्या मिळून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा उपक्रम उभारत आहेत. यासाठी १ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आयपीओ सूचीबद्ध करण्याची तयारी सुरु आहे. याविषयी बीपीसीएल बोर्डाने आयपीओसाठी तत्वतः मान्यता दिली आहे. नियामक आणि इतर मंजुरींच्या अधीन राहून कार्यवाही करण्यात येईल, असे या कंपनीने ‘सेबी’कडे दाखल केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
बीपीसीएल, गेल या दोन कंपन्यांचा महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेडमध्ये प्रत्येकी साडेबावीस टक्के हिस्सा आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड या कंपनीचा ५० टक्के हिस्सा आहे आणि ५ टक्के एवढा हिस्सा महाराष् औद्योगिक विकास मंडळा घेण्यामध्ये स्वारस्य दाखवले आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक सातारा यांसारख्या जिल्हयांच्य सोबतच पुणे, पिंपरी चिंचवड व आसपासच्या प्रदेशांमध्ये शहरी गॅस वितरणासाठी परवाने मिळवून व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने ठरवले आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी कोकणातील अधिक शहरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस वितरित करु शकेल.