खेड : तळवटपाल-गावठणवाडी येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर धाड टाकून १,१२० रूपयांचा ऐवज जप्त केला. सुदेश अशोक पालांडे (४०, रा. तळवटपाल- गावठणवाडी) यास गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करताना रंगेहाथ पकडले. हेडकॉन्स्टेबल प्रवीण खांबे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.