ग्रामीण पोलिसांत महिलेविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी : शेअर बाजारातील गुंतवणूकीतून 50 लाख रुपयांचा फायदा झाल्याचे भासवून इसमाला सुमारे 8 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े. सुधीर भाऊ सकपाळ असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आह़े. फसवणूक करणाऱ्या महिलेने सुरुवातीला मोबाईलवर ग्रृप तयार केल़ा. यानंतर सुधीर सकपाळ यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केल़ी अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली आह़े.
पोलिसांकडून याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा संबंधित महिलेने 4 ते 12 डिसेंबर 2024 दरम्यानच्या काळात एसएमसी इनवेस्टर स्ट्रेटर्जी अपडेट ग्रुप समाज माध्यमावर तयार करुन त्यामध्ये सुधीर सकपाळ यांना समाविष्ट करुन घेतल़े. या ग्रृपमध्ये आरोपी महिलेने शेअर मार्केट संबंधी माहिती देण्यास सुरुवात केल़ी. त्यामध्ये अप्पर सर्किट, ब्लॉक ट्रेड, एआय ट्रडिंग, आयपीओ आदींच्या माहितीचा समावेश होत़ा. महिलेकडून देण्यात येत असलेली माहिती खरी समजून आपल्यालाही नफा होईल अशी अशा तक्रारदार यांच्या मनामध्ये निर्माण झाल़ी.
तक्रारदार यांचा विश्वास संपादन होत असल्याचे पाहून संशयित महिलेने त्यांच्याजवळ गुंतवणूकीसाठी पैशाची मागणी केल़ी. त्यानुसार तक्रारदार यांनी आपल्या बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँकेच्या खात्यातून रक्कम संशयित महिलेला ट्रान्सफर केल़ी. संबंधित महिलेने तक्रारदार यांना तुम्हाला 50 लाख 42 हजार रुपयांचे प्रॉफिट (नफा) झाल्याचे सांगितल़े. हा नफा तुम्हाला देण्यासाठी 10 टक्के कमिशन द्यावे लागेल अशी बतावणी करण्यास सुरुवात केल़ी. तक्रारदार यांनी 8 लाख रुपये देवूनही नफा झालेली रक्कम संबंधित महिलेकडून देण्यात आली नाह़ी.
संबंधित महिला पैसे देत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आल़े. याप्रकरणी त्यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 318 (4), आयटी ऍक्ट 66 (क)(ड) नुसार गुन्हा दाखल केल़ा.
शेअर मार्केटच्या नावाखाली रत्नागिरीत एकाला 8 लाखांचा गंडा
