खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास कार व एसटी यांच्यात अपघात घडला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. अपघातात कारचे नुकसान झाले. भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मंगळवारीही घडलेल्या अपघाताने वाहतूक कोंडी झाली. अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.