चिपळूण : गुहागर-चिपळूण
मार्गावरील रेहळे भागाडी (ता. चिपळूण) येथे दुचाकी अपघातात महिला जखमी झाली होती. या अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक शिवाजी जाधव (२७, रा. अगलगाव, जि. सांगली), असे त्याचे नाव असून, हा अपघात २९ डिसेंबर रोजी झाला होता.
या अपघातात रंजना संदीप खताते (४४, रा. रेहळे भागाडी, शिरळ, चिपळूण) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला, उजव्या पायाला व डाव्या हाताला दुखापत झाली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खताते या दिवसभराचे काम आटोपून एसटीने प्रवास करून औदुंबरबाग रेहळे भागाडी येथील बसथांब्यावर उतरल्या होत्या. तेथून घरी चालत जात असताना समोरून आलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.