रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी
मद्यप्राशन करणाऱ्या प्रौढावर रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसी चंपक मैदान येथे करण्यात आली.
खाजा पटेल इमाम पटेल तळोळी (वय ४४, रा. झाडगाव-एमआयडीसी, रत्नागिरी) असे प्रौढाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेडकॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री तळोळी हे चंपक मैदानातील सार्वजनिक ठिकाणी दारू पित बसलेले होते. मात्र, त्यांच्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नव्हता. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.