राजापूर : मागील काही दिवस शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू असून राजापूरचे नूतन आमदार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेकजण शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधून घेत आहेत. सोमवारी तालुक्यातील भू परिसरातील विविध पक्षाच्या पदाधिकार्यांनी आमदार सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
दरम्यान, भालावली पंचायत समिती गणासह गोदवली जिल्हा परिषद गट भगवामय करणार असल्याची घोषणा आमदार सामंत यांनी केली.
प्रत्येक गावात विकास गंगा आणल्याशिवाय शांत बसणार नाही. गाव तिथे शाखा हा मतदारसंघात उपक्रम राबवणार, असून विकासासाठी घाबरायची गरज नाही कारण प्रत्येक कार्यकर्ता आमदार झाला असल्याचा निर्धार आमदार सामंत यांनी व्यक्त केला.
राजापूर तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आमदार किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश करत असून सोमवारी राजापूर तालुक्यातील भू – पंचक्रोशीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षातील पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी पक्ष प्रवेशाचे औचित्य साधून आमदार किरण सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, आज तालुका भगवा मय होतोय. जनतेने येणारी वेळ ओळखली आहे. त्यामुळे अनेक मान्यवर आपल्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत.आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारून पक्ष प्रवेश केले जात आहेत. येणार्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत कोदवली जिल्हा परिषद गट भगवामय करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले. या प्रसंगी जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, तालुका प्रमुख दीपक नागले, सुनील गुरव, राजु कुवळेकर, मानसी तिरलोटकर , अमोल नार्वेकर, रामचंद्र रांबाडे, विश्वास दळवी, ऋतिक दर्वे, प्रसाद भोसले प्रकाश दिवाळे यांच्या सहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजापूर तालुक्यातील पेंडखलेचे माजी सरपंच राजेश गुरव, शिवसेना ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख जगदीश मटकर, दशरथ कदम, भास्कर खानविलकर, वासुदेव डुकळे, संजय लाखण, विजय मांडवकर विलास महादेव, संतोष निजावे, खिंडळीचे माजी सरपंच मानसी कदम, भू ग्रुप विविध सेवा कार्यकारी सोसायटीचे मनोज कदम, राजेश गुरव, चंद्रकांत जानकर, धनाजी तांबे, रमेश सरफरे, गोविंद राऊत, विजया जोगळे महेश पुराणिक सरिता भिंगे, सुमित म्हात्रे, बबन म्हात्रे, संतोष महादेव, रमेश सरफरे, श्रीकृष्ण सरफरे, देवी अणसुरचे माजी सरपंच आणि शाखाप्रमुख राजाराम भुवड, गावकर प्रशांत भुवड, दर्शन विचारे, वाडा पेठचे राजू जाधव संजय मुळे, अमित कुंभार सदानंद जाधव महादेव मोगरकर यांच्यासहीत शेकडो ग्रामस्थांनी सोमवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. पक्षात नव्याने दाखल झालेल्या सर्वांचे आमदार किरण सामंत यांच्या सहकार्यांसह जिल्हाप्रमुख राहुल पंडीत आणि शिवसेना पदाधिकार्यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.