चिपळूण : कामगाराने दुकानाच्या गोडावूनमधील कपडे चोरुन नेल्याचा प्रकार शहर बाजारपेठेतील तेजल गारमेंटमध्ये 4 जानेवारी रोजी घडला. या प्रकरणी त्या कामगारावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्तकीम शब्बीर दाडेळ असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. या बाबतची फिर्याद इंद्रजितसिंह हरनामसिंह गुलाटी (62, चिपळूण) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 जानेवारी सायं. 4वा. सुमारास शहर बाजारपेठेतील इंद्रजितसिंह गुलाटी यांच्या तेजल गारमेंट या कपडयाचे गोडावून आहे. त्यामधून 30 हजार 228 रुपये किंमतीचा कपडयाचा माल दुकानातील कामगार मुस्तकीम दाडेळ हा चोरुन नेत असताना गुलाटी यांना आढळून आला. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाडेळ याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.