चिपळूण : कोणते तरी विषारी औषध प्राशन केलेल्या हरी रामचंद्र कदम (65, पोफळी) या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
कदम यांनी 28 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता कोणते तरी औषध घेतल्याने त्यांना उलटया होण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे अधिक उपारासाठी नेण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचा 31 डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाला.