रत्नागिरी: जमीर खलफे:-रत्नागिरी जिल्ह्यातील संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी गेली सात वर्षे अविरतपणे सामाजिक कार्य करीत आहे, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात संस्थेचे रुग्ण मदत केंद्र असून तेथे जिल्ह्यातील येत असलेल्या रुग्णांना विनामूल्य सेवा देत आहेत,शिवाय ग्रामीण भागात ही या संस्थेचे काम सुरू आहे.या संस्थेची दखल शासनाने,काही संस्थांनी,घेतली असून अनेक पुरस्कारांनी या संस्थेला सन्मानित केले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात या संस्थेचे कार्य हाजी इम्तियाज बिजापुरी आणि गजेंद्र कृपाल हे फार जोमाने करीत आहेत,या सर्व कामांची दखल आकाशवाणी सिंधुदुर्ग ने घेतली आणि शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर आणि रुग्ण मदत केंद्राच्या कोऑर्डिनेटर सौ निकीता कांबळे यांची मुलाखत घेत संस्थेच्या कामाची माहिती घेतली.सदर मुलाखात ही 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता आकाशवाणी सिंधुदुर्ग येथून प्रसारित करण्यात येणार आहे.प्रारंभी आकाशवाणी सिंधुदुर्ग च्या वतीने संस्थेचे स्वागत करण्यात आले आणि सन्मानचिन्ह देवून आकाशवाणी सिंधुदुर्ग चे वतीने सन्मानित करण्यात आले.