औषध विक्रेत्यांकडून बंदचा इशारा
रत्नागिरी : कोविड-19 महामारी दरम्यान घरपोच औषधं पुरवण्यासाठी दिलेली विशेष परवानगी ज्याचा अवैध ऑनलाइन प्लॉटफॉर्मकडून गैरवापर होत आहे. तसेच सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करत आहे ती तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी औषध विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे. सरकारने ही मागणी मान्य न केल्यास बंदचा इशारा औषध विक्रेत्यांकडून देण्यात आला आहे.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ऍड ड्रगिस्ट (एआयओसीडी) आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स ऍड इगिस्ट्स असोसिएशन, मिळून भारतातील एकूण 12.40 लाख औषध विक्रेते आणि वितरकांचे प्रतिनिधित्व करते. यांनी तिसऱ्यांदा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहून कोवीड 19 महामारी दरम्यान जारी केलेली जीएसआर 220 (ई) अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे. एआयओसीडीचे अध्यक्ष जे. एस. शिंदे आणि महासचिव राजीव सिंघल यांनी सांगितले की, या अधिसूचनेचा उद्देश स्थानिक औषध विक्रेत्यांमार्फत आपत्कालीन परिस्थितीत औषध डिलिव्हरी करणे होता. मात्र, आता स्विगी आणि इतर डिजिटल प्लाफॉर्मद्वारे आवश्यक नियामक उपायांचं पालन न करता घरपोच औषधं पुरवण्यासाठी याचा गैरवापर केला जात आहे. हे सर्व अवैध फ्लॅटफॉर्म वैध प्रिक्रिफ्शनशिवाय औषधांची विक्री करत आहेत ज्यामुळे स्व-चिकित्सा, नशेच्या औषधांचा गैरवापर आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्ती (AR) यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.