रत्नागिरी : निसर्ग चकीवादळाच्या तडाख्यात सापडून मिऱ्या किनारी गेली 6 वर्षे लाटांचा मारा खात ‘बसरा स्टार’ जहाज आजही एकाच जागी अडकून पडलेले आहे. हे जहाज मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावर टेकल्याने 190 कोटी खर्चून उभारण्यात येत असलेल्या या बंधाऱ्याच्या पुढील कामासमोर मोठी अडचण उभी आहे. कारण हे जहाज काढण्यासाठी मेरिटाईम बोर्डामार्फत त्या जहाजाच्या मालकाला दिलेली 6 महिन्यांची दिलेली मुदतही टळून गेली आहे. त्यामुळे प्रशासन या भंगारात गेलेल्या जहजाची विनाविलंब मोडणी करणे भाग पडणार आहे.
मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या 1,200 मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे. पावसाळा संपल्यानंतर पत्तन विभागाने 3 आठवडयापूर्वी ठेकेदाराची बैठक घेतली होती. लवकरात-लवकर उर्वरित टफ्फ्याचे आणि बंधाऱयाया टॉपचे काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित ठेकेदार कंपनीने त्या कामाचा मुहूर्त साधला, पण अजूनही रखडलेल्या कामाला गती मिळालेली नाही.
मीऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या पत्तन विभागाने केलेल्या सर्वेमधील 7 डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे. परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा शिल्लक आहे. सुमारे साडेतीन कि.मी. लांबा हा बंधारा आहे. त्यापैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे. पण त्या कामासमोर अडकलेल्या त्या बसरा स्टार जहाजाची मोठी अडचण उभी आहे. हे जहाज आता भंगारात गेल्याच्या स्थितीत उभे आहे. या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या टफ्फ्यातील 0/00 से 1/200 या दरम्यानचे काम अडकले आहे.
मेरिटाईम बोर्ड ने 22 फेब्रू. 2024 ला त्या जहाजा मालक अब्बास सलीम याला पत्रव्यवहारही केला होता. त्याला 25 मार्च 2024 पर्यत हे जहाज काढण्यासाठी मुदतवाढ दिली होती. पण अजूनही त्यावर हे जहाज मोडणी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या अडकलेल्या जहाजामुळे येथील स्थानिकांना उद्भवणाऱया विविध समस्या तसा शासनाया धूपप्रतिबंधक बंधारा बांधणी कामात अडथळा निर्माण झाला आहे.