खेड : तालुक्यातील घेरापालगड येथे बिबटयाया हल्ल्यात बैला मृत्यू झाला. धनाजी रामचंद्र मोरे यांच्या मालकीचा हा बैल होता. त्यांचे सुमारे 25 हजारांचे नुकसान झाले. बिबटया हा वावर सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतो वातावरण पसरले आहे. वनविभागाने ही बाब गांभीर्याने घेवून मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.