40 वर्षांनी बंद केलेल्या कासे बसफेरीमुळे निर्णय
चिपळूण : चिपळूण एसटी आगारातून गेल्या 40 वर्षांपासून सुरू असलेली कोकरे, नायशी, वडेर, कळंबुशीमार्गे कासे बसफेरी बंद केल्यामुळे विद्यार्थ्योंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागणी कानही चिपळूण आगारातून बस सुरू केली जात नसल्याने 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसह पालक बसस्थानकात ठिय्या आंदोलन करणार आहेत.
पूर्वी ही बस चिपळूण आगरातून सायंकाळी 4ः45 वा. सुटत होती. गेले 2 वर्ष ही बस चिपळूण-कासे-पेंढाबे व्हाया माखजन अशी करण्यात आली आणि आता प्रवासी भारमान नाही म्हणून विद्यार्थ्यां कोणताही वार न करता गेल्या महिनाभरापासून बंद करण्यात आली आहे. या बसमधून असुर्डे, कोकरे, नायशी, वडेर, कळबुशी, कासे, गावातील शेकडो विद्यार्थी सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. हे विद्यार्थी सावर्डे येथून 5 वा. परतीचा प्रवास करत असत. मात्र गत एक महिन्यापासून ही फेरी बंद केल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे. महाविद्यालय 5 वा. सुटल्यावर तब्बल 2 तास सावर्डे थांब्यावर परतीच्या प्रवासासाठी वाट पहावी लागत आहे. सावर्डे परिसरातील 54 गावांतील विद्यार्थी शिक्षण घेत असून शेकडो पासधारक आहेत. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या आणि बस पूर्ववत न केल्यास पजासत्ताकदिनी चिपळूण आगारात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय पालक व विद्यार्थ्यांनी घेतला आहे.