रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला समुद्री सापाने दंश केल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सद्या उपचार सुरू आहेत. संजय रामजी बरड (28, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी, मूळ उमरगाव-पालघर) असे समुद्री साप चावलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हा 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजता मिरकरवाडा येथील समुद्रात रापणीचे मासेमारी करत होत़ा. यावेळी त्याला समुद्री सापाने चावा घेतल़ा. याबाबतची माहिती मित्रांना कळल्यानंतर त्यांनी संजय याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सद्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी मिरकरवाडा येथे मासेमारी करताना तरुणाला समुद्रीसापाचा दंश
