तुषार पाचलकर / राजापूर
लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जांभवली माळ, राजापूर रेल्वे स्टेशन येथे होणार आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ उद्या आमदार किरण सामंत यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग व भाषा मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे, शिवसेना आमदार निलेश राणे, शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरुप, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, विभागप्रमुख नाना कोरगावकर, शैलेश साळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त राजापुरात उद्या राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा
