प्रधानमंत्री मातृवंदना योजना
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वर्ष २०२४-२५ मध्ये ४,९३८ लाभार्थीच्या बँक खात्यावर १ कोटी १७ लाख ७४ हजार रुपये अनुदान जमा झाले. यामध्ये मंडणगड 173, दापोली शहर, ग्रामीण 362, खेड – शहरी, ग्रामीण 552, गुहागर 315, चिपळूण – शहरी, ग्रामीण 867, संगमेश्वर 463, रत्नागिरी – शहरी, ग्रामीण 1518, लांजा – 390, राजापूर 298. अशा तालुक्यातील गर्भवती महिलांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेतला.
आरोग्य विभागातर्फे ८ डिसेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गर्भवती महिलेला एकदाच लाभ दिला जातो. हे ५ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जातात. अॅपद्वारे लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होतात. सुधारित सूचनेनुसार, या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा ६० टक्के, तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग राहणार आहे. आतापर्यंत पहिले आणि दुसरे अपत्य असलेल्या ४,९३८ लाभार्थीच्या खात्यावर १ कोटी १७ लाख ७४ हजार रुपये अनुदान जमा झाले.
ही योजना माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, या उद्देशाने सुरू केली आहे. जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्युदरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा, लाभ हा जन्मावेळी लिंग गुणोत्तर सुधारंणे, स्त्रीभ्रूणहत्येस अवरोध करणे आणि स्त्रीजन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरणार आहे, लाभार्थ्यांकडून आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे, अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्म नोंदणीच्या प्रमाणात वाढ व्हावी, असे प्रयत्न केले जात आहेत.
जिल्ह्यात 5 हजार गर्भवती महिलांच्या खात्यात 1 कोटी 17 लाख जमा
