खेड : लोणावळा येथील गडावरील एकविरा देवी मंदिरात देवाया दर्शनासाठी गेलेल्या अनेक भाविकांसह लहान मुलांवर बुधवारी दुपारच्या सुमारास मधमाशांनी हल्ला चढवून अनेकांना जखमी केले. मधमाशांच्या हल्ल्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाला. यादरम्यान शहरातील एल.पी.इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी गडाचा शेवटचा टप्पा चढण्याअगोदरा शिक्षकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना रोखून ठेवल्याने मोठा अनर्थ टळला. खेड
शहरातील एल.पी.इंग्लिश स्कूलमधील 217 विद्यार्थ्यांसह 19 शिक्षकांची सहल बुधवारी दुपारी लोणावळा येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी गड चढत होते. गडाचा शेवटचा टप्पा चढत असताना देवीच्या मंदिर परिसरात काही तरुणांनी फटाके लावले. फटाक्यांच्या आवाजाने गडावरील मधमाशांनी मंदिर परिसरातील भाविकांवर हल्ला चढवल्याने एका गोंधळ उडाला. या हल्ल्यात अनेक भाविक विशेषत: महिला व लहान मुले जखमी झाले.
यावेळी गडाच्या शेवटच्या टप्प्यात आलेले एलपी स्कूलचे विद्यार्थी मंदिर परिसरात पोहोचणार तोच उडालेल्या गोंधळाची चाहूल घेताना प्रसंगावधान राखत शिक्षक श्रीराम खेडेकर व संतोष तांबे यांनी विद्यार्थ्यांना तिथेच रोखून ठेवले. यामुळे मधमाशांच्या हल्ल्यापासून सहलीतील विद्यार्थी बचावले.
शिक्षकांच्या प्रसंगावधानाने सहलीचे विद्यार्थी बालंबाल बचावले
