चिपळूण : शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी दरवर्षी ज्ञानेश्वरी पठण करण्याची परंपरा जपली जाते; मात्र सलग ५० वर्षे अखंडपणे सामुदायिक ज्ञानेश्वरी पठण करण्याची परंपरा चिपळुणातील वाणीआळी येथील मुरलीधर देवस्थानमध्ये सुरू आहे. येथे दरवर्षी श्रावणात महिनाभर ज्ञानेश्वरी पारायण केले जाते. जुन्या पिढीसह नवी पिढीदेखील यात सहभागी होते. नुकताच या देवस्थानने भक्तिभावाने सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे.
शहरातील वाणीआळी येथील मुरलीधर देवस्थानमध्ये १९७४ मध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झाली. दरवर्षी श्रावण महिन्यात प्रतिपदा ते अमावस्येदरम्यान पारायण केले जाते. या परंपरेची माहिती देताना मुरलीधर देवस्थानचे कार्यकारी अध्यक्ष संजय रेडीज व सदस्य उपेंद्र गुडेकर म्हणाले काय पुरुषोत्तम सहस्त्रबुद्धे यांनी एकोप्याने धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण याची संकल्पना मांडली त्यास वाणी आळीतील तत्कालीन मंडळींनी प्रतिसाद दिला सामुदायिक पारायणाला सुरुवात झाली. लोक धार्मिक कार्यक्रमात व्यस्त असायचे सामुदायिक पारायणात सुरुवातीला सुमारे 200 लोक सहभागी व्हायचे. त्यांच्यात धार्मिकतेची ओढ जास्त होती. चिंचनाका, वडनाका, वाणी अळी परिसरातील दादा मापुस्कर दादा फडके आप्पा डाकवे दादा टाकळे आप्पा चितळे आप्पा मादळेकर घाणेकर आधी जण उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायचे. सकाळी सात ते आठ दरम्यान पारायण घेतले जाते.