नेहरू युवा केंद्र रत्नागिरी तसेच सह्याद्री कला व क्रीडा मंडळ सावर्डे तर्फे आयोजन
अनिकेत जाधव / चिपळूण
भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र रत्नागिरी युवा व क्रिडा मंत्रालय नवी दिल्ली यांचे कडून चिपळूण तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धाचे आयोजन 4 जानेवारी 2025 रोजी सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे ता. चिपळूण येथे करण्यात आले आहे. यामध्ये कबड्डी – मुलगे, खो खो – मुली 100 मी धावणे – मुलगे / मुली, गोळा फेक – मुलगे / मुली, अशा प्रकारे स्पर्धा खेळविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सर्टिफिकेट मिळेल. प्रत्येक स्पर्धेतील तीन विजेत्यांना ट्राॅफी/ सर्टिफिकेट. सांघिक मधील पहिल्या दोन टिमची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. वैयक्तिक खेळातील तीनही विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. तसेच सांघिक स्पर्धेतील प्रथम विजेत्या टिमला 4000 रू. क्रीडा साहित्य मिळेल. सहभागी सर्व स्पर्धकांना सकाळचा चहा नाष्टा मैदानावर मिळेल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोगट 15 ते 29 असा आहे. प्रत्येक स्पर्धकाजवळ आधार कार्ड असले पाहिजे. अधिक माहितीसाठी व स्पर्धा सहभागासाठी 8149264587 जाधव सर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सावर्डे येथे तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धा
