मंडणगड : तालुक्यातील परिवार पार्क येथे एका ५२ वर्षीय प्रौढाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकाऱ्यानी श्रध्दा हॉस्पिटल येथे दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासून त्यांना अधिक उपचारासाठी महाड येथे नेण्यास सांगितले. त्यांना उपचारासाठी नेताना केळवत घाटात हृदयविकाराचा झटका आल्याने कुंबळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. शामराव जालिंदर वाघमारे (52 ) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना १ जानेवारी रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.