रत्नागिरी : कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे रासायनिक खतांच्या दरात वाढ झाली आहे. संयुक्त खतांच्या ५० किलोच्या पोत्यामागे २४० ते २५५ रुपयांची वाढ झाली आहे. दि. १ जानेवारीपासून दरवाढ लागू केली जाणार असल्याचे कंपन्यांनी जाहीर केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
डीएपी व विविध संयुक्त खते तयार करण्यासाठी लागणारे फॉस्फेट रॉक, फॉस्फरिक अॅसिड, अमोनिया, नायट्रोजन, पोटॅश, सल्फर, झिंक या मूलभूत घटकांची आवश्यकता भासते. या घटकांची आयात परदेशातून केली जाते. जागतिक बाजारात कच्च्या मालाचे तर वाढल्यामुळे खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शासनाने खतांवरील अनुदानाची रक्कम वाढविणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर
जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकाचे क्षेत्र ऐंशी हजार हेक्टर तर बागायती क्षेत्र दीड लाख हेक्टर आहे रब्बीचे क्षेत्र अवगत दहा हजार हेक्टर आहे प्रतिकूल हवामानामुळे पिकाच्या उत्पादकता खालावत असताना खत व्यवस्थापन ते पीक काढण्यापर्यंत येणारा खर्च अधिक असल्यामुळे खतांच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नाहीत.
खतांचा भाव दरवर्षी का वाढतोय?
उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले जाते तर दुसरीकडे दरवर्षी दरात वाढ केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.