विदेशी मद्य : 2 लाख 22 हजार 876 लिटरने वाढ, तर बियरमध्ये 3 लाख 38 हजार लिटरने वाढ
रत्नागिरी : कुठल्याही निवडणुकीच्या काळात मद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सरत्या २०२४ साली लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुका झाल्या. त्यामुळे या साली २०२३ सालापेक्षा मद्यविक्रीत सरासरी ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात 2024 साली 2023 पेक्षा मद्य विक्रीत वाढ झाली आहे. देशी मद्याच्या विक्रीत 32 हजार 951 लिटर, विदेशी मद्यात तब्बल 2 लाख 22 हजार 876 ने वाढ तर बियरमध्ये 3 लाख 38 हजार 253 लिटरने वाढ झाली आहे. देशी, विदेशी आणि बियरमध्ये सरासरी 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निवडणुकीच्या कालावधीत मद्याचा महापूर आल्याचे दिसून आले.
निवडणुकांच्या कालावधीत मद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. निवडणुकीत मतदारांना आकृष्ट करण्यासाठी मद्याच्या पार्त्यांचे आयोजन केले जाते. तसेच कार्यकर्त्यांसाठीही मद्याचा वापर केला जातो. २०२४ साली मे मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला. तर विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागली आणि प्रत्यक्ष मतदान २० नोव्हेंबर रोजी घेण्यात आले. त्यामुळे या कालावधीत मतदारांना आकृष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर मद्याचा वापर केला गेला. त्यामुळे २०२३ या वर्षात विक्री झालेल्या