कडवई : नववर्षाच्या निमित्ताने अनेक पर्यटक कोकणात मजा करण्यासाठी येत असतात परंतु सामाजिक भान असलेली दुर्गवीरची टीम मात्र गड किल्ल्यांवर जाऊन साफसफाई करण्यात दंग असते.यावेळी या टीमने चिखली राजवाडीच्या सीमेवर असणाऱ्या भवानगडाची साफसफाई मोहीम राबवली.
दुर्गवीरच्या टीमने सकाळी ठिक ८ वाजता गडावर पोहोचून प्रथम मंदिर साफ करून भवानी देवीला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर या मोहिमेत महिश्यासुर देवाच्या ठिकाणी असलेली २ पाण्याची टाके साफ केली.तब्बल २६ दुर्गवीरांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.भवानगडाची देखभाल शिर्केवाडी व गोसावी वाडी मधील स्थायिक लोक पाहत असतात. त्यांचा संगनमताने ही मोहीम पार पडली. मोहिमेच्या दरम्यान नाष्टा तसेच जेवणाची सोय आकाश शिर्के यांनी केली तसेच टाक्यामधील पाणी बाहेर काढण्यासाठी सलग २ अतोनात मेहनत घेतली व पाणी कमी करून दिले, त्या मुळे टाके लवकर साफ होण्यास खूप मोठी मदत झाली. मोहीम संपल्यावर आकाश शिर्के यांनी सर्व दुर्गविरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.
या मोहिमेत योगेश सावंत,माही सावंत, निशांत जाखी, मंगेश शिवगण,अक्षय गवंडी, तेजल डाफळे,दीप्ती साळवी,सेजल वास्कर,प्रतीक्षा बाईत, सलोनी सनगले, प्रणव राक्षे, उत्कर्ष माने, राहुल रहाटे,रोशन भाटकर,शुभम आंबेकर,सार्थक डोलारे,प्रेम रहाटे,स्वप्नील सापते, स्नेहल कोकरे, सिद्धेश चव्हाण, विवेक चव्हाण, राजवीर चव्हाण, अभिषेक चव्हाण,अजय सावंत,राजेश सावंत, सार्थक चव्हाण या दुर्गविरांनी सहभाग घेतला. प्रत्येक दुर्गवीर हा आपल्या गड-कोटांचे संवर्धन करण्याचा मानस घेऊन उपस्थित होता.