रत्नागिरी : जमीर खलफे:-बाबरशेख क्रिडा मंडळ, हातिस आयोजित रक्तदान शिबिर शनिवार २८ डिसेंबर रोजी पार पडले. या रक्तदान शिबिरात एकूण ३० जण सहभागी झाले. यापैकी रक्तदान निकषानुसार २३ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज उपयोगी उपक्रमात भाग घेतला.
या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापिका यांनी रक्तदान विषय माहिती जमलेल्या सर्वांना दिली. यावेळी महेश तोडणकर, रुपेश(बाळू) नागवेकर, अनिकेत ह. नागवेकर, रोहन ठावरे, बंटी नागवेकर, अक्षय अरविंद नागवेकर, पारस आंबुलकर, दिपाली अरविंद रसाळ, मयुर तोडणकर उपस्थित होते.
यावेळी रक्तदात्यांना मंडळाकडून विशेष भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यासाठी श्री. अनिकेत सुभाष नागवेकर श्री. राजेश विश्वनाथ नागवेकर श्री. प्रशांत मनोहर नागवेकर यांची मोलाची साथ मिळाली.
जिल्हा शासकीय रुग्णालय डॉक्टर आकांक्षा पाचपुते डॉक्टर विनोद जाधव यांजकडून बाबरशेख क्रिडा मंडळाचा सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हातिस ग्रा. वि. मं. हातिसचे माजी अध्यक्ष श्री संदेश नागवेकर, सौ. प्रेरणा सं. नागवेकर, सुमित गोवेकर, सुहास , सुदर्शन, सुयोग, समिल नागवेकर आणि क्रिडा मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.