डेरवण येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात होता शिकत
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर कामथे येथे मंगळवारी मध्यरात्री झालेल्या दुचाकी अपघातात दोन तरुण ठार झाले होते. यात डेरवण वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. साहिल सुर्वे (सावर्डे) असे त्या विद्यार्थांचे नाव आहे. तर उदय किरण आटपलकर (देगलूर-नांदेड) असे दुसऱ्या ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास उदय आटपलकर व त्याचा मित्र साहिल असे दोघेजण दुचाकीने मुंबई-गोवा महामार्गाने सावर्डेकडून चिपळूणच्या दिशेने जात होते. ते दोघे कामथे घाटात आले असता घाट वळणावळणाचा असतानाही घाटातील रस्त्याच्या विशिष्ठ परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन तसेच भरधाव वेगातील दुचाकी महामार्गाच्या लोखंडी गार्डवर जोरदार आदळली. या अपघातात उदय व साहिल सुर्वे या दोघांचंही जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. उदय हा डेरवण येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत होते. त्या दोघांचे कामथे रुग्णलयात शिवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बुधवारी सकाळी अपघातस्थळीची उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पहाणी केली.