दुचाकीचे दोन तुकडे
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर कामथे घाटात मंगळवारी मध्यरात्री दुचाकी दुभाजकावर आदळून अपघात झाला. या अपघातात 2 तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना नव वर्षाच्या पूर्वसंध्येला घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. साहिल राजेंद्र सुर्वे (चिपळूण, कुंभारखणी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही.
सविस्तर वृत्त असे की, थर्टी फस्ट साजरी करून मध्यरात्री दीड वाजता दुचाकीवरून दोन तरुण चिपळूणमध्ये घरी परतत होते. यावेळी कामथे घाटात आल्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन तरुण जागीच ठार झाले. यातील एक तरुण नांदेडमधील असल्याचे समजते. तर दुसरा तरुण चिपळूणमधील कुंभारखाणी येथील आहे. साहिल याचे वडील महावितरण विभागात असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह कामथे रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघाताचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.