देवरुख:-देवरूख नजीकच्या ओझरे गणेशबाग येथे मंगळवारी दुपारी लागलेल्या वणव्यात जलजीवन योजनेचे पाईप जळून खाक झाले आहेत. संबंधीत ठेकेदाराचे सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यात अनेक ठीकाणी वणव्यांमुळे आंबा, काजूच्या बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. मात्र शासनाकडून कोणतीच नुकसान भरपाई दिली जात नाही. मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ओझरे गणेशबाग येथील माळावर वणवा लागला. ओझरे गावात जलजीवन योजनेसाठी आवश्यक असणारे पाईप ठेवण्यात आले होते. वणव्यामध्ये या पाईपने पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत पाईप जळून खाक झाले आहेत. यामध्ये ठेकेदाराचे 6 लाखांचे नुकसान झाले आहे.