खेड : खारी-देवणं पूल येथे गोहत्या प्रकरणी खेड पोलिसांनी अटक केलेल्या सहाही जणांची पोलीस कोठडी संपुष्टात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. देवणं पुलानजीक गोवंश सदृश जनावरांचे अवशेष सापडल्यानंतर गोहत्या झाल्याच्या शक्यतेने वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी अवघ्या 24 तासातच संशयितांच्या मुसक्या आवळल्याने वातावरण निवळले होते. येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी सुरुवातीला चौघांच्या व त्यानंतर दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. याप्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, या पडताळा पोलिसांकडून करण्यात येत आहे.