रत्नागिरी : शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरात मंगळवारी दुपारी 2 वाजता भरदिवसा खळबळ उडवणारी घटना घडली. 5- 6 महील्यांच्या टोळक्याने एका महिलेच्या घरात घुसून कपाटातील दागिने चोरून नेले. या महिलांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हिसका मारून पळून गेल्या आहेत. कल्पना भिसे यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर सीसीटीव्ही चेक करण्यात आले. यामध्ये त्या महिला घरात घुसून दागिने लंपास केले. हातात मिळेल ते घेऊन त्यांनी पोबारा केल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसत आहे. पोलीस श्वानपथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शहर परिसरात या महिलांचा शोध घेतला जात आहे.