पतीवर गुन्हा दाखल
संगमेश्वर : पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द बोलेवाडी येथे मंगळवारी 31 डिसेंबर रोजी 10.30 च्या दरम्यान घडली.
दारू पिण्याचे व्यसन असलेल्या पतीने पत्नीला शिवीगाळ करत तीच्या डोक्याला दगड घालून गंभीर दुखापत झाली आहे. डोक्याला दुखापत झालेल्या पत्नीवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. संगमेश्वर पोलीस ठाण्यात पती विरुद्ध पत्नीने तक्रार दाखल केली आहे.
आंबेड खुर्द येथील नंदकुमार विष्णू बोले याला दारू पिण्याचे व्यसन असून दारू पिऊन घरी आल्यावर तो पत्नीला काहीना काही कारण पुढे करून शिवीगाळ करून वादावादी निर्माण करून तीला मारहाण करत असतो. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून पत्नी दोन मुलांना घेऊन शेजारी असलेल्या घरी गेले. तिथे आठ दिवस राहत होती.
मंगळवार 31 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास पत्नी ही शेजारील महिलेला सोबत घेऊन स्वतःचे व कपडे घेण्यासाठी तिच्या घराकडे गेली असता नंदकुमार याने शिवीगाळ करत तीच्या डोक्यात दगड घातला. यावेळी दगड डोक्याला लागून ती तेथेच जमिनीवर कोसळली. दगड लागून गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तिने पती नंदकुमार याच्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केले असून या पूर्वीही तिने पती दारू पिऊन मारहाण करत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केले असल्याचे नमूद केले असून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल -मनवळ अधिक तपास करत आहेत.